Thursday, 1 June 2017

शिवराय आचरणात आणणे आहे !!

रोज सकाळी पेपर उघडला कि,पहिली बातमी दिसते कि खून, बलात्कार, चोरी, दरोडा, आत्महत्या अशीच, आणि आता ते इतका सवयीचा झालाय कि बहुतांश लोक अशा बातम्या वाचताच नाहीत. हे नेहमीचाच म्हणतात आणि पुढचा पान उलटतात. आपली मन मरत चालली आहेत.

शिवशाही च्या आधीची परकीय राजवट आठवा तेव्हा भारत असाच होता. दिल्ली ची जुलमी राजवट अशीच होती, तेव्हा हि असाच होता कि रस्त्याने जाताजाता बायकांना उचलून नेण. कधीही कुठेही कोणाचीही लुटालूट करण. खून करन. सरकारी कर्मचाऱ्यांचा जनतेला असाच त्रास होता, सरकार विरोधी फिर्याद करणार्याला कितीही बरोबर असला तरी उलट फोजदरी जाच असायचा. हेच सगळ होत. तेव्हा सत्ता होती परकीयांची. आनंदाने एकोप्याने भारतात राहणाऱ्या आपल्या लोकांना ग्रहण लावलं या बाबर, मुघालान्सारख्या यवनी सत्तांनी. पण मग पुन्हा सूर्योदय झाला आणि एक वेळ अशी आली जेव्हा आपल्या शिवरायांची सत्ता आली. राजा कसा असावा, राज्य कसा असावे, राज्यकारभार कसा असावा, गुन्हेगारांवर वाचक कसा ठेवावा, सरकारी नोकराने रायातेशी कसे वागावे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर बदल करायचाच असेल तर प्रयत्न केला तर अपेक्षित बदल करता येतो हे शिवरायांनी केल आणि दाखवला. आपली मुठभर मराठी सेना घेऊन यावनंसारख्या शत्रूला उलथवून लावणारे शिवराय, परस्त्री बरोबर गैरवर्तन करणाऱ्या रंज्याचे पाटलाचे हाथ पाय कलम करणारे शिवराय. परस्त्री बरोबर मातेसमानच वागायला हवे हे शिकवणारे आणि आपल्या वर्तनातून ते दाखवून देणारे शिवराय. स्वतापेक्षा धर्माचे आणि धरणीचे महत्व जाणणारे आणि मानणारे शिवराय. स्वकष्टाने उभारलेले स्वराज्य कायम श्रींचे म्हणून श्री चरणी लीन होणारे शिवराय. अशाच राज्य कर्त्याची आता आपल्याला गरज आहे.

कारण तीच यवन संस्कृती परत भारतावर राज्य करू पहात आहे. देशात रोज शेकडो बलात्कारासारखे गुन्हे घडतात कित्येक गुन्हे उजेडात हि येत नाहीत. आपल्या आजूबाजूला जे चाललाय ते जोवर आपल्या स्वतावर येत नाही तोवर तिकडे न बघण्याची वृत्ती वाढत चाललीये. केंद्रात सत्ता असणारे पक्ष या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसतायत कारण त्यांना कागदोपत्री सगळ छान छान दाखवायचं. पण मांजर जेव्हा डोळे मिटून दुध पिता तेव्हा सगळ्या जगाला दूध पिताना ते मांजर दिसताच असत तसाच काही या राज्यकर्त्यांचा झालाय त्यांना वाटतंय हे जे चाललाय ते कोणाला दिसत नाहीये. पण जे हे सगळ भोगतायत त्यांना दिसायची काय गरज आहे.

आज हजारो युवक एकजूट होऊन पुन्हा सरकार विरोधी आंदोलन निदर्शन करत आहेत, गेली साठ वर्ष शांत झालेला युवा रक्त आता पुन्हा पेटून उठताय. साठ सत्तर वर्षापूर्वी हि अशीच एक परकीय सत्ता उलथवून लावणारी एक युवक क्रांती झाली होती. आत्ताही पुन्हा हा लढा लढायची वेळ येऊ लागलीये आता गरज आहे ती फक्त ह्या रक्ताला दिशा देणाऱ्या शिवराया सारख्या नेतृत्वाची. आणि अशा युवकांचे पाठबळ वाढवणाऱ्या जिजाऊ सारख्या मातांची.

"शिवाजी जन्माला यावा परंतु दुसऱ्याच्या घरात"

हि मनोवृत्ती जो पर्यंत आपण बदलत नाही तो पर्यंत हा बदल होणे शक्य नाही..

"राजे पुन्हा जन्माला या" अस म्हणण्यापेक्षा आपल्या विचारात ,आचरणात राजे आणण्याची गरज आहे...

लेखन: ऋषिकेश सुदर्शन शिंदे...

अधिक माहितीसाठी

खालील apps Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा

 
शिवसह्याद्री  Android App 

Download करा

स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page 

Like करा

No comments:

Post a Comment

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...