महाराष्ट्राच्या मातीत आणि या मातीतल्या माणसांच्या मनात आणि आचरणात ज्यानं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच बीज ज्या आईने पेरलं, ती आई म्हणजे जिजाऊसाहेब.
त्यांना फक्त शिवबांच्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राच्या आई म्हणाव लागेल, म्हणूनच राष्ट्रमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकांनंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेशे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचा हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मानवी मुल्यांचा आदर करणारे विचार, जे छत्रपतींच्या आचरणात होते, आपण म्हणू शकतो या आईनेच त्यांना दिले; त्यासाठीचे वातावरण आणि संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. हा सह्याद्रीचा राजा, सहयाद्री सारखाच कणखर आणि अंगाई सारखा दयाळू व मायाळू या आईच्या पदराखालीच झाला. पुढे छत्रपतींच बाळ, बाळराजे, धर्मवीर संभाजी महाराज ही याच कुशीत आणि संस्कारात वाढले.
महाराष्ट्राला छत्रपती आणि त्या छत्रपतींना विचार आणि आचार आणि आपल्या भाषेत Vision देणार्या आऊ जिजाऊचा आज जन्मदिवस. या वेळेस २०१७ ची जिजाऊ जयंती म्हणजे संक्रमण स्थितीतील महाराष्ट्राची जिजाऊ जयंती. आज महाराष्ट्र म्हणजे जाती–पातींनी ग्रासलेल राज्य, सामाजिक आणि आर्थिक दरीने ग्रासलेल राज्य, एक दूरदृष्टी नसलेल आणि ती कधी भविष्यात येईल की नाही अशा शंके मधे असलेल राज्य. शेतकरी अजुन ही आत्महत्या करतो आहे, आता तर ते लोन कापसाच्या पिका पासून द्राक्षाच्या पिकापर्यंत आलय. आता, जयंती आणि आनंद–उत्सवाच्या दिवशी असा विषय बोलू नये असे वाटते; पण मग आपलेच डोळे आपण आऊ जिजाऊची आठवण काढली की आपोआप उघडतात. ज्या मातीसाठी आणि मराठी मुलखसाठी जीणे आपल बाळ दिल आणि आपलही आयुष्य त्या मूलखाच्या कल्याणासाठी घालवल अशा आईला जन्मदिनी असो की कधी ही असो हे सगळ पाहून या पेक्षा वेगळ काय वाटेल.
पूर्ण प्रगतीच्या आणि जागतीकरणाच्या उंबरठ्यावर असणारी शहरे आणि त्याच जागतीकरणा पासून कोसो दूर असणारी गावे, खूप अंतर वाढलय–सामाजिक आणि आर्थिक स्थितीत. कुणी जागतिकीकरणामुळे फुलासारख बहरूण निघलाय तर कुणी होरपळून! या आर्थिक प्रक्रियेत हे होणे साहजिक आहे आणि हा एक प्रकारचा नियमच. पण जिथे कशा ही नियमाला न जुमानता लोक–कल्याणकारी सहकार चळवळ उभी राहिली, स्त्री शिक्षणाचे धडे गिरवले गेले, जिथे अखिल मराठा–ब्राम्हण–दलित समाज जाती पातीचा विचार न करता संयुक्त महाराष्ट्रा साठी उभा राहीला. आणि येथेच जातिभेद निर्मुलनासाठी साठी शिंदे, पाटील, जोशी आणि आंबेडकर एकच ध्येय घेऊन खांद्याला खांदा लाऊन लढले, अशा या आमच्या महाराष्ट्राला नजरच लागली म्हणाव लागेल. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीचे इतके कणखर अनुभव असलेला महाराष्ट्र आज केविलवणा चेहरा घेउन दिल्लीत आणि जगा समोर उभा आहे का?
आज खूप महत्व आलय दारीद्र्य निर्मूलनाला, म्हणजे या पूर्वी कधी ही नव्हतं इतक. कारण सामाजिक दऱ्या भरून काढायला आर्थिक सुधारणेचा मार्ग खूप सोप्पा आसतो आणि या सुधारणा सगळ्या पर्यंत पोहचवणे म्हणजे दारीद्र्या निर्मूलन. शहरे बदललीत आता गावे ही बदलायचीत आपल्याला. येणाऱ्या बदलाला फक्त पैशाचा रंग नको तर संस्कृतीचा ही असावा, अस काहीतरी करायचय. तर हे कराव लागेल आपल्या सारख्या शिकलेल्या युवकांना. जागाच सगळ ज्ञान एकत्र करून आपल्याला आपल्या अर्थसत्तेचा पाया आधी मजबूत करायचा आहे. आपण शिकलोत आणि आता आपल्या मागे असलेल्या बांधवांना आपण शिकवायचय. जगात घडणारे बदल, ते फ्लॅट होतेय की अजुन गोल होतय की नाहीसच होतय हे त्याना आपण त्यांच्या भाषेत सांगायचय. याने त्यांना कळेल की अर्थार्जनाच्या प्रक्रियेत कुठे बदल करावा लागेल. म्हणजे नेमक कोणता धंदा करायचा नी कसा करायचा हे कळेल त्यांना. आणि जमलतर ते आपणच समजून सांगायचय त्यांना. जमलच आपल्या पैकी कुणाला, तर बिनधास्त जावे त्याने घरी– गावकडे, तालुक्याला, आईच्या हाताची भाकर खावी आणि स्वतःच कराव काहीतरी, रोजगार ही निर्माण होईल आणि कदाचित जास्त पैसा ही मिळेल. आता खरच खूप गरज आहे हे सगळ करण्याची, जमेल त्यांनी आणि जमेल तेंव्हा हे नक्की करावे. कारण तुम्ही नाही गेलात तर मग भांडवलदार येतील तेथे, मोठी दुकाने थाटतील आणि मग आपल्यालाही तिथेच पाठवतील. तेंव्हा ते सांगतील ते कराव लागेल. त्या पेक्षा हे बरं आहे. पण पुन्हा एक सल्ला हा ‘एक‘ मार्ग आहे उत्थानाचा आणि खूप अवघड ही; म्हणून जपून. पण तस पाहिलं तर आधी पेक्षा बराच सोप्पा ही. बघा जमलं तर.
तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग करून, जगाच्या अभ्यासाचा उपयोग करून मिळवलेले जागतिकीकरणाचे ज्ञान, त्यात टिकण्याचे ज्ञान आणि प्रगतीसाठीचे ज्ञान समाजातील तळागळाच्या घटकांपर्यंत घेऊन जायला हवे. आऊ जिजाऊच्या कृपेने तूमच्या सारखे युवक या मातीला मिळालेत; तुमच्या सारखे म्हटलंय कारण या विषयावर काही वाचण्याची इच्छा ही आजकाल संपत चालली आहे.महाराष्ट्र अजूनही रायगडावरील पताकेसारखा राष्ट्रात फडकू शकतो, तुमच्या सारख्या समजूतदार इच्छाशक्तीने आणि युवकांच्या सुजाण प्रयत्नांनी. म्हणूंच जमेल ते करा, जमेल तेथे करा,झेंड्याखाली राहून करा की झेंड्या बाहेर जाऊन करा, पण काही तरी समाज उपयोगी करा. कारण इथेच आपली येणारी पिढी जगायची आहेत.
हे सगळं साध्य होण्यासाठी प्रत्येक स्त्रीने आई जिजाऊ होणं गरजेचं आहे...
पुन्हा एकदा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना त्रिवार वंदन करून, आम्हाला राष्ट्रनिर्मितीचा ध्यास लाव, आम्हाला आणि मुलाबाळांना तर सुखी ठेवच ठेव पण या सुखाला कायम ठेवण्यासाठी एक समाज व्यवस्था निर्माण करान्याची ताकत दे आणि न ढळणारी दृढ इच्छाशक्ती दे हीच प्रार्थना करू.
-ऋषिकेश सुदर्शन शिंदे.
पंढरपूर जि. सोलापूर
स्वराज्य माझ्या राजांच Android App Download करा
शिवसह्याद्री Android App
Download करा
स्वराज्य माझ्या राजांच Facebook Page
Like करा
No comments:
Post a Comment