Thursday, 21 May 2020

इतिहास तळोदयाचा

तळोदा येथील बारगळ गढी हि 360 वर्ष जूनी आहे हिचे बांधकाम भोजराज बारगळ यांनी 1662 साली लावले होते हे काम एकूण 7 वर्ष चालले होते या गढिचा 8 फुट खोल बीम आहे गढीचे बांधकाम एकूण 6 एकर जागेत पसरले आहे हि गढी तापी नदिपासुन 3.5 किलोमीटर व सातपुडाच्या पायथ्याशी आहे गढ़ीचे कारागीर हे राजस्थान हुन बोलावले होते,राजस्थानी व मराठा शैलीत गढिचे काम झाले आहे,आजुबाजूच्या 7 गावांना येथे वस्तीसाठी आणले होते,तळोदा हे 16व्या शतकात एक खेड गाव होत,बारगळ हे मुळ नगर जिल्ह्यातले होते प्रथम शिवाजीराव बारगळ येथे आले प्रथम ते सुल्तानपुर येथे थांबले सुल्तानपुर हे 800 वर्षापासून तालुका व परगणा होते नंतर ते तळोदा येथे आले इथे सातपुडयाच्या रांगेत वसलेल्या अक्राणी येथील गडमुंजा संस्थानचे राजपूत राजे यांच्या सेवेत ते रुजू झाले राज्याच्या सिमेचे रक्षण करण्यासाठी बारगळ यांना तळोदा येथे गढी बांधून देण्यात आली या गढिचा अजुन एक उज्वल इतिहास म्हणजे भोजराज बारगळ हे सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सख्हे मामा मल्हाररावांचे वडील लहानपनीच गेल्याने भोजराज यांनी बहिनीचा व भाच्याचा सांभाळ केला.मल्हाररावांचे संपूर्ण बालपन याच गढ़ीत गेले पुढे त्यांना भोजराज यांनी 25 घोडयांचे शिलेदारी पथक तयार करून तोरखेडचे सरदार कदमबांडे यांच्या मनसबदारीत रुजू केले व तिथेच पेशव्यांनी त्यांचा पराक्रम पाहुन त्यांना आपल्याकड़े मागून घेतले मल्हाररावांना भोजराज बारगळ यांनी आपली कन्या दिली व याच गढित त्यांचे लग्न लावले,पुढे नारायणराव भोजराज बारगळ हे राजपुताना येथील राजा संग्रामसिंह व देवसिंह यांच्या सेवेत रुजू झाले तिथे त्यांना बूढा परगणा जहागीरीत भेटली त्याचे त्यांनी दोन भाग केले एक मल्हाररावांना दिले त्याचे नाव मल्हारगड व एक स्वतकडे ठेवले त्याचे नाव नारायणगड ..
तळोदा हे कसबे गाव तसे तळोदयाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्व हि मोठे आहे या गढीला गोंदवलकर गुरुजी व स्वातंत्र्यवीर सावरकर हे हि येऊन गेले आहेत सध्या या गढीत बारगळांचे 9 वे वंशज श्रीमंत अमरजीतराव बारगळ हे असतात तसेच हृषिकेश बारगळ हे त्यांचे भाऊबंद हि असतात अमरजीत बारगळ हे मराठा साम्राज्यातिल सर्व संस्थानीक यांची जी राजघराणे संघटना आहे जिचे अध्यक्ष तंजावरचे भोसले आहेत तीचे उपाध्यक्ष अमरतजीत बारगळ हे आहेत व पेशव्यांचे वंशज हे कार्यध्यक्ष आहेत..
असा हा तळोदयाचा व बारगळ गढीचा इतिहास..

खाली बारगळ गढीतील फोटो , सावरकरांनी बारगळ जहागीरदार यांना भेट म्हणून दिलेली त्यांची टोपी.

माहिती लेखण
©️-प्रसाद पाठक ,
संपर्क : 9420372982
पत्ता: 139,दामोदर नगर ,शहादा रोड, तळोदा जि,नंदुरबार

(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील त्यावर हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


8 comments:

  1. खूपच छान लेख. आपल्याकडून अशीच साहित्य सेवा घडू दे ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    ReplyDelete
  2. भाऋऊ खुपच छान मांडणी आहे,अप्रतिम

    ReplyDelete
  3. खूपच छान लेख आहे भाऊ

    ReplyDelete
  4. मी तलोद्याचा असून मला गडी बद्दल बरे काही माहीत होते आपल्या लेखाने माझा माहितीत अधिक भर पडली, तळोदायात होळी हा सण फार उत्साहात साजरा केला जातो , होळी सगळयात आधी गढीत पेटायची व तेथून आम्ही टेम्भे पेटून पळत जाऊन आपल्या गल्लीतील होळी पेटवत होतो

    ReplyDelete
  5. हा लेख वाचल्याने ज्ञानात भर पडली।
    मी इथली सून आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
  6. A nice information to today's Generation
    Thanks and keep updating.

    ReplyDelete

श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...