Sunday, 17 June 2018

छत्रपती शिवरायांच्या जगातील पहिल्या पुतळ्याची गोष्ट.



१९२० मध्ये ग्वाल्हेर येथे मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली. यात कोल्हापूरचे महाराज राजर्षी शाहू महाराज, ग्वाल्हेरचे संस्थानिक माधव महाराज शिंदे, सरदार खासेराव पवार यांनी पुढाकार घेतला.

जेथे शिवरायांचे बालपण गेले, ज्या जिल्ह्यात स्वराज्य जन्मास आले त्या पुणे शहरात हे स्मारक उभारायचे असे नक्की झाले. १९२१ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला. १९२८ मध्ये शिवजन्माला ३०० वर्ष पुर्ण होणार म्हणून हा पुतळा १९२८ मध्ये उभारायचा असे ठरवले. (आत्ताच्या कालखंडानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारिख १९ फेब्रुवारी १६३० हि मान्य झालेली आहे त्याकाळी शिवरायांचा जन्म १६२७-२८ मध्ये झाला अशी समजूत दिसते).

पुतळ्याच्या कामासाठी सर्व जाती धर्माचे, राष्ट्रांचे हात कामास आले. चिनी कारागीर, ब्रिटीश शासक, मुस्लीम असे सर्व घटकांचा पुतळा उभारणीमध्ये हातभार राहिला.

कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराजांनी हे काम ख्यातनाम शिल्पकार श्री गणपतराव म्हात्रे यांना दिले. गणपतराव म्हात्रे यांनी अश्वारुढ पुतळा तयार करणे तर करमरकर यांनी पॅनेल्स तयार करणे असे ठरले. पॅनेल्सच्या अभ्यासासाठी करमरकर यांनी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ आणि बॉम्बे युनिव्हर्सिटीत अभ्यास केला. या पॅनेल्सवरती शिवरायांचे शौर्य, राजकारणपटुत्त्व, धर्मावरील श्रद्धा आणि नितीमत्ता दाखवायची होती. पॅनेल्सचे काम तपासण्यासाठी इंग्रज परिक्षक आला असता करमरकर यांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली. पुढे म्हात्रे यांना काम वेळात पुर्ण करणे अशक्य दिसू लागताच हे काम करमरकरांनी पुर्ण करावे असे ठरले. अन्यथा हे काम परदेशी शिल्पकाराला मिळणार होते. याप्रसंगी छत्रपतींचे दिवाण म्हणाले, “करमरकर या कामामुळे तुम्ही जगद् विख्यात व्हाल.”


शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील अचूकतेसाठी हेन्री ऑक्झेंन्डेन व आर्म्स हिस्ट्री मधील वर्णन उपयोगी पडले.  भारतात तोपर्यन्त ब्रॉन्झमध्ये एकसंध घोड्यावरचा पुतळा कोणीही केलेला नव्हता. हे आव्हान करमरकरांनी स्वीकारले. मेकेगॉन अॅण्ड मॅकॅन्झी कंपनीतील एक मुख्य फोरमन रॉसमिसन, काशीराम देसाई आणि गुलाम मोहम्मद यांनी हे काम तडीस नेले. रॉसमिसनने हाताखालच्या कामगारांना सांगितले होते की, “काम मैं गडबड हुईं तो मैं टुमपर गोली चलांकर खुद को भीं गोली मारेगां , फॉउंन्ड्री औंर करमरकरका नाम रखों या मर जाओं.”


पुतळा मुंबईवरुन पुण्यास आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला होता. पुतळा बोगद्यांमधून व्यवस्थितरित्या येण्यासाठी रेल्वेच्या पायाची उंची साडेतीन फुटींवरुन एक फुट करण्यात आली होती. तसेच पुतळ्याचा एक लाख रुपयांचा विमा काढण्यात आला होता.


पुतळ्याचे हातावरील तासकाम चिनी कारागिरांनी केले. पुतळा पुण्यात आणणे हे एक दिव्यच होते. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हि पहिलीच घटना होती.

११ जून १९२८ रोजी रेल्वे पुण्याला निघाली. पुतळ्याचा १ लाखांचा विमा उतरविण्यात आला होता. बोगद्याच्या तिथे पुतळा तिरपा करुन गाडी पुढे नेण्यात येत होती. गव्हर्नर विल्सन याने करमरकरांचे पुतळ्याच्या कामाबद्दल अभिनंदन केले. पुतळ्याच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमाला दहा हजार लोक हजर होते. अनावरण प्रसंगी २१ तोफांची सलामी देण्यात आली.

या उद्धाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची जबाबदारी असलेले लोक शिल्पकाराला निमंत्रण द्यायचे विसरले. १५ जूनला सकाळी सकाळी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली. करमरकरांनी कार्यक्रमास माझ्या सर्व सहकार्यांना बोलवा अशी भूमिका घेतली. त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली. १६ जूनला हा सगळा कार्यक्रम पार पडला. त्याचे वृत्त केसरीने २६ जून १९२८ रोजी छापले. या कार्यक्रमात शिल्पकाराचा सत्कार करण्याचा कार्यक्रम समाविष्ट नव्हता. म्हणून २१ जुलै रोजी पुण्यात पंडित मदनमोहन मालविय यांच्या हस्ते शिल्पकाराचा सत्कार करण्यात आला. 



पुतळा ओढण्यासाठी २० बैलगाड्या जुंपण्यात आला. तरिही पुतळा पुढे नेणे अशक्य झाल्यानं नगरपालिकेचा स्टीम रोलर बोलवण्यात आला.
-प्रा.गणेश राऊत

संदर्भ-
शिल्पकार करमरकर – लेखक सुहास बहुळकर 

Sunday, 29 April 2018

नरवीर शिवा काशीद


वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा न्हावी आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.


-----------------------------------------
संकलन - ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर जि. सोलापूर.
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


Monday, 15 January 2018

संभाजी महाराजांचा राज्याभिषेक

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने विशेष लेख !

छत्रपती शिवरायांच्या माध्यमातुन निर्माण झालेल्या छत्रपती पदाने खऱ्या अर्थाने इथल्या रयतेला स्थैर्य दिले. आपले राज्य, आपली व्यवस्था ज्यामध्ये एका अभिषिक्त राजाच्या छत्रछायेखाली आपल्याला सर्व प्रकारच्या न्याय, सुरक्षितता आणि कल्याणाची हमी मिळु शकेल हा विश्वास इथल्या रयतेच्या मनात छत्रपती पदामुळे निर्माण झाला.

ते केवळ पद राहिले नाही, तर लोकांच्या जगण्याचा आधार बनले. जुलमी व्यवस्था संपुन लोककल्याणकारी व्यवस्था अंमलात आल्याचे ते प्रतीक होते.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक महत्व
थोरल्या महाराजांच्या अकाली जाण्याने लोकांचा आधार हरवला. परत एकदा जुलमी व्यवस्थेचे सावट येऊन आपण पारतंत्र्यात जातो की काय अशी भीती रयतेच्या मनात निर्माण झाली. मात्र शंभुराजांनी १६ जानेवारी १६८१ या दिवशी आपला राज्याभिषेक करुन घेतला. खचलेल्या रयतेला आधार दिला. थोरल्या महाराजांच्या काळातील व्यवस्था पुढेही कायम राहील याची हमी दिली.

खऱ्या अर्थाने शंभुराजांनी लोकांना परत एकदा उभे केले. त्यांच्यात इतका स्वाभिमान भरला की शंभुराजांच्या जाण्यानंतरही इथली रयत त्या स्वाभिमानावर अविरत झुंजत राहिली. औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशहाला त्यांनी इथल्याच मातीत संपवले.

पार्श्वभुमी
राज्यकारभारात एखाद्या शासनकर्त्याचे निधन झाल्यास त्याची जागा कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो. छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतरही हा तशी काही परिस्थिती नव्हती. मात्र जाणीवपुर्वक वाद निर्माण केले जातात. वास्तविक शिवरायांच्या राज्याभिषेक समयी सोयराबाईंना पट्टराणी तरसंभाजीराजेंना युवराज म्हणुन मान मिळाला. तिथेच स्वराज्याचे पुढचे छत्रपती संभाजीराजेच असतील यावर शिक्कामोर्तब झाले.

शंभुराजे लहानपणापासुनच जिजाऊ आणि शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे घेत होते. त्यात ते तरबेजही झाले. शिवरायांच्या सुचनेनुसार शंभुराजेंनी पन्हाळ्यावरुन राज्यकारभार सुरु केला.

दरम्यान ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर छत्रपती शिवरायांचे आकस्मिक निधन झाले. शंभुराजांच्या गैरहजेरीत बाल राजारामांना गादीवर बसवुन काही स्वार्थी दरबारी मंत्र्यांनी आपल्या हातात राज्यकारभार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना त्यात अपयश आले. शंभुराजांनी पन्हाळगडावरुनच ही कठीण परिस्थिती हाताळुन राज्यकारभाराची घडी नीट बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु स्वराज्याला दुसऱ्या छत्रपतींची आवश्यकता निर्माण झाली होती.

श्रीशंभुराज्याभिषेक घडामोडी
शके १६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी (नागपंचमी) म्हणजेच २० जुलै १६८० रोजी संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि त्यांनी स्वतःला “राजा” झाल्याचे घोषित केले. यासंदर्भात डाग रजिस्टर मध्ये २४ ऑगस्ट १६८० ची नोंद आहे –

“जुन-जुलै शिवाजीराजा मरून संभाजीला त्याचे सिंहासन मिळाले असावे असे सर्वत्र बोलले जाते. आपल्या बापाच्या तत्त्वांप्रमाणे संभाजी वागणारा आहे असे लोक म्हणतात.”

संभाजी महाराजांचा कारभार रायगडावरुन सुरळीत सुरु झाला. त्यांनी आगळीक करणाऱ्या सर्व मंत्र्यांना माफ करुन पुन्हा त्यांच्या पदावर पुन्हा नियुक्त केले. मोरोपंत पिंगळेंच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राला पेशवाई दिली गेली.


शंभुराजांची राजमुद्रा
७ मे १६८० रोजी रुद्राप्पा देसाई याला लिहिलेल्या पत्रात महाराजांची राजमुद्रा दिसुन येते. शंभुराजांची राजमुद्रा शिवरायांपेक्षा वेगळी असुन तिचा आकार पिंपळाच्या पानासारखा आहे.


श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||


अर्थ- शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणुन असणार नाही ? (सर्वांवर छत्र म्हणुन राहील.


श्रीशंभुराज्याभिषेक सोहळा
थोरल्या महाराजांच्या मृत्युनंतरच्या अस्थिर वातावरणात झालेल्या मंचकरोहणात शंभुराजे व त्यांच्या सहकारी मंत्र्याधिकाऱ्यांना त्यातुन तितके समाधान व शास्त्रार्थाच्या दृष्टीने निर्दोषत्व वाटले नाही. त्यामुळे शंभुराजांवर विधियुक्त राज्याभिषेक करवुन राजसिंहासानाची प्रतिष्ठा राखावी असा विचार झाला. त्यानुसार शंभुराजांनी आपला राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला.


१४, १५ व १६ जानेवारी १६८१ (रौद्रनाम संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२) यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.


राज्याभिषेक प्रसंगी पुर्वीच्या कैद्यांना मुक्त करण्याचा रिवाज असल्याने शंभुराजांनी कैद्यांना मुक्त केले. प्रधान मंडळातील अण्णाजी दत्तो, निळोपंत, बाळाजी आवजी, जनार्धनपंत आदींच्या समावेशाने प्रधान मंडळ नेमुन त्यांना कारभार सांगितला गेला.


संभाजी राजांच्या प्रधान मंडळाची रचना –
सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले )
श्री सखी राज्ञी जयति – छत्रपती येसुबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)
सरसेनापती – हंबीरराव मोहिते
कुलएख्तीयार (सर्वोच्च प्रधान) – कवी कलश
पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे
मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी
दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव
चिटणीस – बाळाजी आवजी
सुरनीस – आबाजी सोनदेव
डबीर – जनार्दनपंत
मुजुमदार – अण्णाजी दत्तो
वाकेनवीस – दत्ताजीपंत


छत्रपती संभाजी महाराजांची नाणी
शिवरायांप्रमाणेच शंभुराजांनीही आपल्या राज्याभिषेक प्रसंगी स्वतःच्या नावे नाणी पाडली. सदर नाण्याच्या पुढच्या बाजुवर “श्री राजा शंभूछत्रपती” ही अक्षरे कोरलेली असुन मागच्या बाजुवर “छत्रपती” हे अक्षर कोरलेले आहे.


राज्याभिषेकानंतर शंभुराजांची कर्तबगारी
आपला राज्याभिषेक झाल्यानंतर शंभुराजांनी लगेच १५ व्या दिवशी बुऱ्हाणपुरवर छापा टाकला आणि १ करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. त्यानंतर त्यांनी मोगल, इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्दी या शत्रुंना नामोहरम करीत पुढील केवळ आठच वर्षात शिवरायांनी उभारलेले स्वराज्य दुप्पट केले. सैन्यही दुपटीपेक्षा अधिक वाढविले. स्वराज्याच्या खजिन्यात तिपटीपेक्षा अधिक वाढ केली.


संकलन – शिवपुत्र शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे.



श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...