Showing posts with label शिवाजी महाराज. Show all posts
Showing posts with label शिवाजी महाराज. Show all posts

Friday, 22 May 2020

शिवराज्य


छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. उत्तरेत मोगल ,दक्षिणेत विजापूरची आदिलशाही, भागानगर चा कुतूबशाह ,पोर्तुगीज, सिद्धी,इंग्रज यांच्या विरोधात संघर्ष करून स्वराज्याची बांधणी मजबूत केली. 1645 ते 1680 हा महाराजांचा राजकीय कालखंड होय.हा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका सुंदर आहे. या ठिकाणी रयतेचे राज्य होते. येथील प्रत्येक माणसाला मीच छत्रपती आहे असे वाटून स्वराज्याच्या लढात्यात आपले रक्त त्यानी बलिदान केले. वयाच्या16 व्या वर्षी स्वराज्याचे  लावलेले झाड छत्रपतींनी त्यांची मूळे इतकी खोल रोवली केली.उत्तरेतून येणाऱ्या औरंगजेबाला ती उकरुन काढताआली नाहीत.1682ला छत्रपती च्या निधनानंतर स्वराज्य लगेच जिंकून घेता येईल या उदेशाने आलेल्या औरंगजेबास दक्षिणेत मराठयाशी 25 वषे प्रदीर्घ संघर्ष करावा लागला. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, मराठयांची भद्रकाली महाराणी ताराबाई यांच्या शी त्याने संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष तरी अंगावर काटा आणारा आहे. महाराजांच्या निधनानंतर1681ते 89हा इतिहास मराठी सत्तेचा असमितेचा आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी,इंग्रज,पोर्तुगीज यांच्या शी लढून स्वराज्य राखले. धर्मवीर राज्या म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते. मध्य युगीन भारताच्या इतिहासात धर्मासाठी आपले प्राण देणारा राजा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना ओळखले जाते.202 युद्धे लहान मोठेे त्यांनी जिंकले.छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर छ.शिवाजी महाराज आणि
 महाराणी सोयराबाई चे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांनी 1689 पासून ते1699पर्यंत स्वराज्य राखले.1689ला रायगड औरंगजेबाने जिंकल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे तामिळनाडू मधील जिंजी चा किल्ला जो किल्ला छ.शिवाजी महाराजांनी 1678 ला दक्षिण मोहिमेत जिंकून घेतला होता. तेथून1689 ते 1695 पर्यंत राजकारभार पाहिला.मराठयांची राजधानी जिंजी ही त्यांनी बनवली. मोगल सरदार झुलफिकारखान यांच्या विरोधात 10 वर्षे संघर्ष केला. त्यांनी वतनदारी व्यवस्था सुरू केली. 1695 ला छ.राजाराम महाराज स्वराज्यात परत आले.1695 ला सातारा ही राजधानी बनवून मराठी स्वातंत्र्य युध्दांचे नेतृत्व केले. त्याच्या निधनानंतर महाराणी ताराबाई यांनी 1699 ते 1707 पर्यंत औरंगजेबाच्या मूत्यू पर्यंत त्याला फक्त झुलवत ठेवले. ताराबाई नी नवीन युद्ध पध्दत सुरू केली. औरंगजेबाला किल्ला उन्हाळ्यात विंकत दयाचा आणि पावसाळ्यात तो पुन्हा जिंकून घ्यायचा.यातून स्वराज्याची अर्थव्यवस्था सावरली. राणीच्या पराक्रमाचे कौतुक समकालीन इतिहास कार खाफीखान याने तारीखे ई खाफीखान या ग्रंथात केले आहे.औरंगजेब सुध्दा कौतुक करतो.स्वराज्य वाढवण्यामध्ये शिलेदारांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तानाजी, येसाजी, कंकाजी, कोंडाजी, बाजी, नेताजी, वीरशिवा, संताजी, धनाजी यासारखे शेकडो शिलेदारांनी पराक्रमाचे शौर्य गाजवले.
प्रा.विनोद जालिंदर निकम
(एम.ए.इतिहास, सेट,जीवनप्रबोधिनी कन्या
 महाविद्यालय ,विटा. जि. सांगली
मो.9146256525

(सदर लेखाचे अधिकार लेखकाचे राहतील हा लेख जास्त लोकांपर्यंत पोहचावा ह्या हेतूने स्वराज्य माझ्या राजांच वेबपोर्टल वर Post केला आहे त्यावर वेबपोर्टल चा अधिकार नाही. )
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


Sunday, 29 April 2018

नरवीर शिवा काशीद


वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते.
दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते.
वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.
दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदार आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते.
झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती, विजा लखाकत होत्या, पालखी धावतच होती, नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली. वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्या प्रमाणे हेरलेली पालखी घेऊन १५-२० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने विशाळगडाकडे मार्गस्थ झाली.
शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. थोड्याचवेळात त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले, आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजीराजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले की हा तर शिवा न्हावी आहे. सिध्दीने त्यास विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले शिवाजीराजेंसाठी हजार वेळा मरावयास तयार आहे, शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिध्दीने शिवा काशिदांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
आता पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला, नुसताच मनस्ताप, पश्चात्ताप आणि चिडचिड, घोड्याला टाच मारून अवघे एल्गारत निघाले वाटेतील गुढगा गुढगा चिख्खल तुडवीत.
इतिहास शिवा काशिदांचे धाडस, प्राणाची आहुती कदापि विसरु शकणार नाही, कारण शिवा काशिद सारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.
स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांची पन्हाळगडाला लागूनच समाधी उभारली आहे. हा समाधी परिसर विकसित करण्यात येत आहे, शौर्य स्मारकांत वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाचे दर्शन घडविणारे तीन म्युरल्स साकारली आहेत. पहिल्या म्यूरलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व वीर शिवा काशीद यांच्या भेटीचा प्रसंग चितारला आहे. दुसऱ्या म्युरलमध्ये शिवराय राजदिंडीमार्गे पालखीतून विशाळगडाकडे कूच करतानाचा प्रसंग आहे. तिसऱ्या म्युरल्समध्ये वीर शिवा काशीद यांच्या बलिदानाचा प्रसंग रेखाटला आहे. बारा बाय दहा फूट आकारातील हे म्यूरल्स आहेत.


-----------------------------------------
संकलन - ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर जि. सोलापूर.
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा


Thursday, 9 November 2017

अफजलखानाचा वध




शिवप्रताप दिन -10 नोव्हेंबर

तो आला नव्हता त्याला आणला होता , तो मेला नव्हता त्याला मारला होता.

प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाची लढाई आहे. प्रतापगडाची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात रोमांचक क्षण मानला जातो. शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या रुपात आलेले स्वराज्यावरील संकट अफजलखानाचा वध करून तसेच त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतवून लावले. शिवाजींनी पुण्याजवळील मावळ प्रातांत नियंत्रण मिळवले होते. त्या वेळेस हा भाग अदिलशाहीच्या अखत्यारीत येत होता त्यामुळे त्यांच्या दृष्टीने शिवाजीचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. विजापूरच्या दरबारात शिवाजींचा बंदोबस्त करण्याची मोहिम अफजलखानाकडे देण्यात आली. अफजलखानाने यापूर्वी शिवाजींचे थोरले बंधु संभाजी यांची हत्या केली होती तसेच आदिलशाही दरबारात त्याचे व शिवाजींचे वडील शहाजी यांचेही वैर होते. अफजलखान मोठा फौजफाटा घेऊन विजापूरहून जून १६५९ मध्ये निघाला.  वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत आला. शिवाजी महाराजांनी खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला. अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर शिवाजी चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु शिवाजी महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला. तो पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती. अफजलखानाच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी  सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या.अफजलखानाने जंजिर्‍याच्या सिद्दीशी हातमिळवणी करून कोकणच्या बाजूनेही आपले पाश आवळले.


शिवाजींनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असल्याचे दाखवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण शिवाजींनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले. प्रत्येक पक्षाचे १० अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्या बाहेर थांबेल. व इतर अंगरक्षक दूर रहातील असे ठरले. भेटीची वेळ नोव्हेंबर १० इ.स. १६५९ रोजी ठरली. 

 भेटीच्या दिवशी अफजलखान भेटीच्या वेळेआधीच शामियान्यात आला. शिवाजींनी जाणून बूजून अतिशय भव्य शामियाना बनवला होता. निःशस्त्र भेटायचे ठरले असले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता  व खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजींनी १०० टक्के धरली होती. त्यामुळे त्यांनी अंगरख्या खाली चिलखत चढवले होते व लपवण्यास अतिशय सोपी वाघनखे  हातामध्ये लपवली होती. भेटीच्या सुरुवातीसच खानाने शिवाजींना अलिंगन देण्यास बोलवले व उंच अफजलखानाने शिवाजींना आपल्या काखेत दाबून बिचव्याचा वार केला. परंतु चिलखत असल्याने शिवाजी महाराज बचावले. खानाने दगा केलेला पाहून शिवाजींनी लपवलेली वाघनखे काढली व खानाच्या पोटात घुसवून त्याची आतडी बाहेर काढली. अनपेक्षित प्रतिवाराने भेदरलेल्या खानाने दगा दगा असा आक्रोश केला व इतर अंगरक्षकांना सावध केले. इतर अंगरक्षकांच्यात तिथेच जुंपली. सय्यद बंडाने शिवाजींवर वार केला परंतु तो जिवा महाले (संकपाळ) यांनी आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम पालखी वाहणार्‍या भोईंचे पाय तोडले व जखमी अफजलखानाला मारून त्याचे शीर धडापासून अलग केले. शिवाजींनी हे शीर नंतर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले. शिवाजींनी झपाट्याने किल्यावर प्रयाण केले व तोफांनी आपल्या सैन्याला अफजलखानाच्या सैन्यावर आक्रमण  करायचे आदेश दिले. मराठे सैनिकांच्या तुकड्या प्रतापगडाच्या जंगलात दबा धरून बसल्या होत्या. तोफा धडाडताच त्यांनी अफजलखानाच्या सैन्यावर झपाट्याने काही कळायच्या आत आक्रमण केले. कान्होजी जेधे याने बंदूकधार्‍यांवर आक्रमण केले. दुसर्‍या एका कमानीच्या हल्यात मुसाखान जखमी झाला व पळून गेला. अफजलखानाच्या सैन्याची वाताहत झाली.नेताजी पालकर यांच्या नेतृत्वाखाली घोडदळाने अफजलखानाच्या वाईच्या तळावर अचानकपणे हल्ला चढवला व तेथेही त्यांची वाताहत केली. आदिलशाही सेनेसाठी हा जबरदस्त पराभव होता. अफजलखानाचा वध ही संपूर्ण आदिलशाहीसाठी मोठी घटना होती. जवळपास ५,००० सैनिक मारले गेले व तितकेच जखमी झाले. जवळपास ३,००० सैनिक युद्धबंदी बनवण्यात आले. मराठ्यांचे पण  त्यांच्या सैनिकक्षमतेच्या दृष्टीने थोडेफार नुकसान झाले.  शिवाजींनी विरोधी सैन्यातील बंदीवानांना योग्य तो मान दिला. जखमींची योग्य ती शुश्रुषा केली गेली. कोणत्याही बंदीवान स्त्री अथवा पुरुषांवर अत्याचार झाले नाहीत. बऱ्याच जणांना परत विजापूरला पाठवण्यात आले.

पुढील १५ दिवसात शिवाजी महाराजांनी सातारा, कोल्हापूर व कोकणात किल्ले काबीज करायचा धडाका लावला व त्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले. कोल्हापूर जवळील पन्हाळा किल्यापर्यंत त्यांनी मजल मारली. या घटनेनंतर शिवाजी महाराजांची एक कुशल नेता म्हणून ओळख प्राप्त झाली. अफजलखानासारख्या बलाढ्य सेनापतीचा पार धुव्वा उडवल्यामुळे शिवाजींचा भारतभर लष्करी दरारा वाढला.


-----------------------------------------
संकलन - ऋषिकेश सुदर्शन शिंदे
पंढरपूर जि. सोलापूर.
-----------------------------------------

स्वराज्य माझ्या राजांच Android App येथून 👉Download करा

शिवसह्याद्री  Android App येथून
👉Download करा

स्वराज्य माझ्या राजांच फेसबुक पेज येथून 👉 Like करा



श्रीशिवराज्याभिषेक

रायगड सजले , भारतात समाज शासनबद्ध झाला आणि मराठ्यांच्या राज्यकारभारात नवे पर्व सुरू झाले- राजधानी रायरीवर शिवाजी महाराजांचा राज्...